परतावा व रद्द धोरण
शेवटचा बदल: 23 ऑक्टोबर 2026
समर्थ ग्रोकडून खरेदी केलेल्या उत्पादनांसाठी आणि प्रशिक्षण नोंदणीसाठी ऑर्डर रद्द करणे, परत करणे आणि पैसे परत मिळणे याबाबतचे नियम.
1. ऑर्डर रद्द करणे
ऑर्डर पाठवण्यापूर्वी (डिस्पॅचपूर्वी) तुम्ही ती कधीही रद्द करू शकता. +91 97653 35570 वर कॉल / व्हॉट्सअॅप करा आणि ऑर्डर क्रमांक सांगा. पैसे भरले असल्यास पूर्ण रक्कम परत केली जाते. ऑर्डर पाठवल्यानंतर ती रद्द करता येत नाही; मात्र खालील नियमांनुसार परत करता येते.
2. खराब, गळती झालेली किंवा चुकीची वस्तू
पार्सल मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत फोटोसह कळवा. तपासणीनंतर आम्ही वस्तू मोफत बदलून देऊ किंवा त्या वस्तूची पूर्ण रक्कम परत करू. अशा परतीचा खर्च आम्ही करतो.
3. परत करता येणाऱ्या वस्तू
न वापरलेल्या, मूळ स्थितीतील ग्रो बॅग आणि कंपोस्ट / गांडूळ खत बेड डिलिव्हरीपासून ७ दिवसांच्या आत परत करता येतात. अशा वेळी परत पाठवण्याचा खर्च ग्राहकाचा असेल.
4. परत न करता येणाऱ्या वस्तू
गुणवत्ता व स्वच्छतेच्या कारणास्तव उघडलेली किंवा वापरलेली द्रव उत्पादने (दशपर्णी अर्क, जैविक द्रव्य, व्हर्मीवॉश), उघडलेले सेंद्रिय खत आणि जिवंत गांडूळ (गांडूळ बीज) परत घेतले जात नाहीत; मात्र ती खराब किंवा चुकीची मिळाल्यास वरील नियम क्रमांक २ लागू होतो.
5. प्रशिक्षण (वर्कशॉप) नोंदणी
प्रशिक्षणाच्या ४८ तास आधी रद्द केल्यास पूर्ण रक्कम परत केली जाते. त्यानंतर रद्द केल्यास रक्कम परत होत नाही, पण तुमची नोंदणी पुढील बॅचमध्ये मोफत हलवता येते. आम्ही प्रशिक्षण रद्द किंवा पुढे ढकलल्यास तुम्ही पूर्ण परतावा किंवा नवीन तारीख यापैकी निवडू शकता.
6. गार्डन सेटअप सेवा
किचन टेरेस गार्डन सेटअपसाठीचे दर, आगाऊ रक्कम आणि रद्द करण्याच्या अटी गच्ची पाहणीनंतर दिलेल्या कोटेशनमध्ये स्पष्ट लिहिल्या जातात.
7. पैसे कसे आणि केव्हा परत मिळतात
परतावा मंजूर झाल्यावर ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांत ज्या पद्धतीने पैसे भरले त्याच पद्धतीने (UPI / बँक खाते / कार्ड) रक्कम परत केली जाते. बँकेनुसार खात्यात जमा होण्यास आणखी काही दिवस लागू शकतात.
संपर्क
Samarth Grow (Prop. Rupali Vijay Mali)
समर्थ प्लाझा, पी. ए. पी. ५७/१, ५ स्टार, एम.आय.डी.सी., रेमण्ड चौक, सांगाव कॉर्नर
📞 +91 97653 35570
· ✉ samarthgrow.organic@gmail.com
इतर धोरणे: नियम व अटीगोपनीयता धोरणपरतावा व रद्द धोरणडिलिव्हरी धोरण